लघु कथा : नेटिव्ह म्हणजे ? काही दिवस पूर्वीची हि गोस्ट आहे . मी आणि माझा एक कार्यकता मित्र आम्ही आमच्या वार्डात काही फार्म वाटायला निघालो . आधी फार्मचे ५० झेरॉक्स करून घेतले . फार्म २ पानी होता म्हणजे १०० झेरॉक्स .अलीकडे झेरॉक्स चे पैसे हि वाढले आहेत एका कॉपी चे २ रुपये . चांगला गठ्ठाच झाला समजायचे . मित्राने थोडे फार्म घेतले मी थोडे आणि एक रजिस्टर सुद्धा घेतले नाव , गाव इत्यादी लिहिण्या साठी . घरून बाहेर पडलो , मित्रा कुठं जायचे मला मित्राने विचारले मी म्हणालो अरे काम साधेच आहे चल कुठल्याही चाळी पासून सुरू करू , रस्त्या पलीकडे दहा चाळीची वस्ती होती . तिला दहा चाळ म्हणूनच ओळखले जायचे ! दिवसाचे १० वाजले होते , दिवस सुट्टीचा म्हणजे रविवार चा होता . चाळीतले लहान पोर दोन दोन चाळीतील गल्लीत खेळात होते बाया मंडळी घराच्या दारा पुढे सफाई , रांगोळी टाकत होत्या आणि मोठी माणसे काही पेपर वाचीत तर काही एक -दोन च्या ग्रुप मध्ये गप्पा करीत दिसत होते , बऱ्याच घरचे टीव्ही सुरू होते आणि मालिका सुरू होत्या. आम्ही पहिल्या खोली च्या दारा पुढेच उभे झालो . नवीन कोणी आला ...
Posts
Showing posts from October, 2018